Bachchu Kadu: रवी राणांनी त्यांच्या व्यक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी बच्चू कडूंची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu kadu

Bachchu Kadu: रवी राणांनी त्यांच्या व्यक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी बच्चू कडूंची मागणी

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. रवी राणा यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीसाठी बोलावलं आहे. अशातच एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणालेत की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला आज संध्याकाळी मी त्यांच्या भेटीला जाणार आहे. त्यांनी एकतर पुरावे द्यावे नाहीतर मग त्यांनी माफी मागावी. मला समाधानकारक उत्तर नाही आली तर मी पुढील कारवाई करेन. जे की आहे ते आरपार झालं पाहिजे असं कडू बोलताना म्हणालेत.

पुढे बच्चू कडू बोलताना म्हणाले की, माझी जी बदनामी राणा यांनी केली त्याबतीत पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांनी त्याबद्दल माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी. त्यांच्या वक्तव्यामुळे सगळ्या आमदारांवर आरोप केल्याचं दिसून येत आहे असंही ते म्हणालेत.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू. कार्यकर्त्यांशी बोलू त्यानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. आज शिंदे राणा आणि शिंदे यांना भेटल्यानंतर त्यांच्यातील वाद मिटणार की आणखी वाढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: Rana VS Kadu: रवी राणा, बच्चू कडू वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, राणा आज शिंदेंच्या भेटीला

रवी राणा, बच्चू कडू वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये मधस्थी करणार आहेत. रवी राणा हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झालेत. ते आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना देखील भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे लवकरच हा वाद मिटणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.