Rana VS Kadu: रवी राणा, बच्चू कडू वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, राणा आज शिंदेंच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rana VS Kadu: रवी राणा, बच्चू कडू वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, राणा आज शिंदेंच्या भेटीला

Rana VS Kadu: रवी राणा, बच्चू कडू वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, राणा आज शिंदेंच्या भेटीला

एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंद केल्यानंतर पन्नास खोके एकदम ओके अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हा वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर 50 खोके घेतल्याचा आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी राणांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना थेट राज्य सरकारलाच इशारा दिला. रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावेत अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. हा वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाऊन पोहचला आहे.

आता वरिष्ठ पातळीवर हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये मधस्थी करणार आहेत. रवी राणा हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झालेत. ते आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना देखील भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे लवकरच हा वाद मिटणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

हेही वाचा: Bacchu Kadu : 'महाठग खिसे कापणारे आणि नंतर...; बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर घणाघाती टीका

दरम्यान, रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावेत अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेऊ असं कडू यांनी म्हटलंय. तसेच आपल्याला सात ते आठ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही कडू यांनी केला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये मधस्थी करणार आहेत.

हेही वाचा: बच्चू कडू-रवी राणांची ईडीमार्फत चौकशी करा; काँग्रेसची मागणी