आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात वॉरंट

आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात वॉरंट

सोलापूर : शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि महापालिकेतील गटनेते चेतन नरोटे यांना 3 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर होण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले.

या प्रकरणात माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, बाबा करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करिम शेख आदींना बुधवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. याबाबत न्यायालयाने उद्यापर्यंत सरकारी पक्षास म्हणणे मांडण्यास सांगितले. 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता.

या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्‍काबुक्कीही करण्यात आली होती. या प्रकरणात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण आणल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com