
Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधींना शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळा दराडे यांनी धमकी दिली आहे. राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू जर काळे फासता आले नाही तर त्यांच्यावर दगडफेक करु असे दराडे यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही, असे बाळा दराडे यांनी सांगितले.