बाकी सगळे...जय हिंद, जय महाराष्ट्र ! बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंवर टीका | Bala Nandagonkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bala-Nandgaonkar

बाकी सगळे...जय हिंद, जय महाराष्ट्र ! बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : मुंबई येथील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandagonakr) यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्विटमध्ये नांदगावकर म्हणाले, शिवाजीपार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे. बाकी सगळे... जय हिंद, जय महाराष्ट्र, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. (Bala Nandagaonkar Criticize Uddhav Thackeray For Public Rally In Mumbai)

हेही वाचा: धमकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

ठाकरे यांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. या प्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित होते. आमचं हिंदुत्व नकली नाही. डोक्यात हिंदुत्व लागतं.

हेही वाचा: "जगावर जेव्हा संकट येतं तेव्हा WHOला देखील..."; आदित्य ठाकरे म्हणाले

दाऊद जर भाजपात आला, तर त्याला ही मंत्री करतील. महाराष्ट्राला बदनाम करताय, असा आरोप ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर केला. नुसतं बोंबलायचं. संयम पाळतो. याचा अर्थ आम्ही नामर्द नाही. एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रूप करण्याचा काम भाजप करत असल्याचे ते म्हणाले. आता कोणाला अयोध्याला जायचं जाऊ द्या, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे.

Web Title: Bala Nandagaonkar Criticize Uddhav Thackeray For Public Rally In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uddhav ThackerayMumbaimns
go to top