
बाळासाहेबांनी रामदास कदमांसाठी गडकरींकडे शब्द टाकला आणि भाजप झुकली!
शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि जिकडेतिकडे त्यांचीच चर्चा सुरू झाली. कोण आहेत रामदास कदम, त्यांचं पक्षातलं महत्त्व काय, ४० - ५० वर्षे राजकारणात असलेल्या कदमांच्या नाराज होण्याने सेनेला काय नुकसान होणार आहे, या सगळ्याचा अंदाज येण्यासाठी हा किस्सा फारच उपयोगी पडेल. (Ramdas Kadam Shivsena)
हेही वाचा: आयुष्याची संध्याकाळ अंधारमय, रामदास कदम ढसाढसा रडले
१९८०-८५ च्या काळात शिवसेनेची (Shivsena) मुळं चांगलीच घट्ट झाली होती. रामदास कदम (Ramdas Kadam) त्या काळात मोठ्या जोमाने सेनेचं काम करत होते. बाळासाहेबांनी भल्याभल्यांना बाजूला सारत रामदास कदमांना खेडमधून विधानसभेचं तिकीट दिलं होतं. ते निवडून आले. पुढे मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णीही लागली.
हेही वाचा: शिवसेना संपवण्याचे काम पवार काका पुतण्यांनी केलं- रामदास कदम
आता खेड हा कदमांचा हक्काचा मतदार संघ राखीव झाला होता. तिथून ते चार वेळा निवडून आले होते. २००९ च्या निवडणुकीत मात्र त्यांनी बाळासाहेब ठाकरेंकडे (Balasaheb Thackeray) आग्रह धरला आणि दापोली मतदारसंघावर दावा सांगितलं. मात्र तिथले आमदार सूर्यकांत दळवी ठाम राहिले आणि आपला मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यानंतर गुहागर मतदारसंघाकडे मोर्चा वळला आणि तो मतदारसंघ सोडण्यासाठी थेट नितीन गडकरींनाच (Nitin Gadkari) बाळासाहेबांनी गळ घातली.
हेही वाचा: शिवसेनेला मोठा धक्का : माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा राजीनामा
नितीन गडकरींसमोर आता मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. गुहागर म्हणजे जणू भाजपाचा बालेकिल्लाच. वर्षानुवर्षे या भागात नातू कुटुंबाचाच करिश्मा होता. पण बाळासाहेबांचा शब्द कसा पडू द्यायचा? त्यामुळे या द्वंद्वातून बाहेर पडत अखेर गडकरींनी डॉ. विनय नातूंचा गुहागर हा मतदारसंघ शिवसेनेसाठी आणि रामदास कदमांसाठी सोडला. पुढे रामदास कदमांचा मुलगा योगेश याच्यासह त्यांनी दापोली मतदारसंघातूनही विजय मिळवला.
Web Title: Balasaheb Thackeray Shivsena Ramdas Kadam Bjp Nitin Gadkari Uddhav Thackeray Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..