esakal | राज्याचा उपमुख्यमंत्री ठरला? वाचा कोणती आहेत नावे!
sakal

बोलून बातमी शोधा

राज्याचा उपमुख्यमंत्री ठरला? वाचा कोणती आहेत नावे!

- महाराष्ट्रात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार

राज्याचा उपमुख्यमंत्री ठरला? वाचा कोणती आहेत नावे!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानुसार आता राज्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळण्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला.

अजित पवार यांचा राजकीय सन्यास?

आता उद्या महाशिवआघाडी सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली जाणार आहे. तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून तर जयंत पाटील राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

loading image