काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

काँग्रेसचे माजी आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या विखेंना शह देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई: काँग्रेसचे माजी आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या विखेंना शह देण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

बसराज पाटील यांच्याकडे काँग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी देण्यात आली असून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत होते. पण, त्यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसनं नवीन चेहऱ्यांना देखील संधी दिली असून प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांची देखील प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नसीम खान यांच्या खांद्यावर विधानसभा उपगट नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच विधानपरिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची निवड झाली असून रामहरी रुपनवार उपनेतेपदी निवड झाली आहे. तर, विधानपरिषदेचे प्रतोद म्हणून  भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat appointed as Congress Legislature Party leader