"याची जबाबदारी मी स्विकारतो"; मतफुटीवर बाळासाहेब थोरात म्हणाले...

काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला यासंदर्भात आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsakal media

मुंबई : विधानपरिषदेचा निकाल लागला असून काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे तर महाविकास आघाडीतील पाच उमेदवारांची वर्णी लागली आहे. तर जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीत आपले आमदार फुटल्याचं मान्य केलं आहे. दरम्यान शेवटच्या क्षणाला आम्हाला यासंदर्भात आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

(Balasaheb Thorat After Loss One Seat In MLC Election 2022)

विधानपरिषदेचा निकाल आज रात्री उशीरा लागला. त्यामध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे तर भाई जगताप विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील आमचे मत फुटल्याचं माध्यमांना बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या कारणावरून त्यांनी फुटलेल्या आमदारांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Balasaheb Thorat
MLC Election 2022 Result: 'किंगमेकर फडणवीसच'; भाजपचा पाचही जागांवर विजय

काँग्रेसकडील त्यांचे स्वत:चे तीन मत फुटल्याचं समोर आलं आहे. तर शिवसेनेचे तब्बल १२ मत फुटल्याचं समोर आलं असून थोरातांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अकरा उमेदवारांपैकी काँग्रेसच्या हंडोरेंचा पराभव झाला आहे.

दरम्यान विधानपरिषद निवडणुकीचा निकाल पार पडला असून महाविकासआघाडीचे पाच तर भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, भाजपचे राम शिंदे, भाजपचे प्रविण दरेकर, शिवसेनेचे आमशा पाडवी, भाजपचे उमा खापरे, भाजपचे श्रीकांत भारतीय, शिवसेनेचे सचिन अहिर, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com