
पिकविमा रक्कम शेतकऱ्यांस मिळावी अशी आमची इच्छा आहे.
'हिटलरसारखं काम कोण करतात हे भाजपला चांगलंच माहितीये'
आपला प्रचार, विरोधकांबाबत अपप्रचार करण्यासाठी वारंवार रेटून बोलण्याची हिटलरनीती केंद्रातील भाजप सरकारने अवलंबली आहे. ज्या प्रकारचे कार्यक्रम (इव्हेंट) हिटलर करायचा, त्याच प्रकारचे कार्यक्रम आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल लगावला होता. राऊतांच्या या टीकेची मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठराखण केली आहे. हिटलरसारखे साम्य असणारे नेमके कोण काम करतात हे जनतेला माहिती असून ते भाजपा नेत्यांनाही चांगलेच माहिती आहे, असा टोमणा त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
हेही वाचा: मुंबईत NIA ची कारवाई, माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणींची मालमत्ता जप्त
यावेळी थोरात म्हणाले, पिकविमा रक्कम शेतकऱ्यांस मिळावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुंबईतील एनआयए छापेमारीवरून ते म्हणाले, कोणत्या संदर्भात छापे झाले माहिती नाही, या विषयाच्या संदर्भात गृह मंत्रालय भाष्य करेल त्यानंतर नेमकी माहिती समजेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. घोंघावत असणाऱ्या असनी चक्रीवादळ आणि पाऊस पीक नुकसानीबाबत थोरात म्हणाले, राज्यात अचानक वादळ पाऊस नुकसान संदर्भात नुकसान पीकाचे सर्व्हे करायला सांगितले आहे. राज्य शासन याबाबत कायमच अलर्ट असते.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना काय म्हणाले आहेत राऊत?
आपला प्रचार, विरोधकांबाबत अपप्रचार करण्यासाठी वारंवार रेटून बोलण्याची हिटलरनीती केंद्रातील भाजप सरकारने अवलंबलेली आहे. ज्या प्रकारचे कार्यक्रम (इव्हेंट) हिटलर करायचा, त्याच प्रकारचे कार्यक्रम आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. शिवसेनेशिवाय सोशल मीडिया पुढे जाऊ शकत नाही. बाळासाहेब आमचे फेस होते, त्या वेळी सोशल मीडिया कुठे होता? हिटलर सगळ्यांना प्रिय होता, बाळासाहेबांनाही आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरचे अनुकरण करतात. ज्या प्रकारचे कार्यक्रम हिटलर करायचा त्याच प्रकारचे कार्यक्रम मोदी करत आहेत, असे म्हणत मी टीका करत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हेही वाचा: 'राष्ट्रीय महामार्गाचे काम आमच्यावर सोडा, किमान तुम्ही...'
Web Title: Balasaheb Thorat Reaction On Raut Statement Bjp Know Who Start Hitler Propaganda
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..