हर्षवर्धन पाटील यांच्या बचावासाठी थोरात आले पुढे; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी नाही, त्यामुळे नाराज असलेले काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रेदशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पुढे आले असून त्यांनी म्हटले आहे की, लोकसभेवेळी राष्ट्रवादीने हर्षवर्धन यांना वचन दिले होते, ते पाळले गेले नाही.

मुंबई : इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी नाही, त्यामुळे नाराज असलेले काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रेदशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पुढे आले असून त्यांनी म्हटले आहे की, लोकसभेवेळी राष्ट्रवादीने हर्षवर्धन यांना वचन दिले होते, ते पाळले गेले नाही.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना लॉटरी

राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीत काँग्रेस पक्षासाठी पुणे जिल्ह्यातील केवळ भोर, जुन्नर आणि पुरंदर या तीन जागा सोडल्या आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीने स्वतःकडे राखून ठेवली आहे. त्यांमुळे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे नाराज झाले असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हर्षवर्धन पाटील यांची पाठराखण केली आहे.

इंदापूरबाबत शरद पवारांशी सकारात्मक चर्चा

दरम्यान, इंदापूर जागेसंदर्भात शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. परंतू, हर्षवर्धन पाटील नॉट रिचेबल असल्यामुळे संपर्क होऊ शकत नाही. आता काय करायचं ते हर्षवर्धन पाटील यांनी ठरवायचे असल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb thorat speak on Harshwardan Patil and NCP dispute