राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये लॉटरी; महाडिक, चित्रा वाघ यांना मोठी जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या नेत्यांना मोठी लॉटरी लागली आहे. कोल्हापूरचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय महाडिक यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या नेत्यांना मोठी लॉटरी लागली आहे. कोल्हापूरचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय महाडिक यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

राष्ट्रवादीला धक्का; तटकरेंचा राजीनामा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (ता.05) गुरुवारी खालील संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये धनंजय महाडिक (कोल्हापूर), शेखर इनामदार (सांगली) आणि चित्रा वाघ (मुंबई) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

इंदापूरबाबत शरद पवारांशी सकारात्मक चर्चा; आता चेंडू हर्षवर्धन यांच्या कोर्टात

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे प्रदेश उपाध्यक्षपद हे चित्रा वाघ यांच्यासाठी डबल लॉटरी असल्याचे मानण्यात येत आहे. तसेच धनंजय महाडिक यांनीही पक्षाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत केवळ पाच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनाही प्रदेशउपाध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. तसेच, त्यांच्यासोबत सांगलीच्या शेखर इनामदार यांचीही प्रदेशउपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitra wagh, Dhanajay mahadik Shekhar Inamdar Appoints as a BJP Vice President