Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

अजित कमळ बघ, शरद गवत आण..!

मुंबई - बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्या वाचनावरून राज्यभरात नवा गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या मुद्यावरून विरोधकांची खिल्ली उडवली. 

सुलभ शिक्षण व वाचन यासाठी लहान मुलांना  ‘अजित कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण,’  असं शिकवले जाते, याचा दाखला देत विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या नावाशी याचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट करताच विधानसभा हास्यकल्लोळात बुडाली. मात्र, नवीन संख्यावाचनाची पद्धत थोडी बदलेली असली, तरी त्यामध्ये मूळ उच्चारदेखील कायम ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही संख्यावाचनाबाबत अधिक तज्ज्ञांची समिती नेमून याचा विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवर विरोधकांनी काल खिल्ली उडवली होती. आज त्यावर मुख्यमंत्र्यांनी शेलक्‍या शब्दांत पलटवार केला. बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकात असलेल्या वाक्‍यांची उदाहरणे देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटे काढले. या उदाहरणाचा कोणत्याही सदस्यांशी संबंध नाही, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com