वर्षभरात बालभारतीचे स्वतंत्र चॅनेल; वर्षा गायकवाड यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. आता पुढच्या वर्षभरात बालभारतीचे स्वतंत्र चॅनेल सुरू केले जाईल, अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.

पुणे - विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. आता पुढच्या वर्षभरात बालभारतीचे स्वतंत्र चॅनेल सुरू केले जाईल, अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संस्थेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त व किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात गायकवाड बोलत होत्या. या वेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, समन्वयक विवेक गोसावी, कवी इंग्रजीत भालेराव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गायकवाड म्हणाल्या, कोरोना हे आव्हान होतेच, पण ती संधी देखील होती. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी आॅनलाइन करता आल्या. 

महापालिका, जिल्हा परिषदेसह अनेक शाळा व्हर्च्युअल झाल्या आहेत. त्या शाळेतील मुलांसाठी दर शनिवारी विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करणे शक्य आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिक्षण मिळेल. महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशासाठी रांगा लागतात, याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केला जाणार आहे. बालचित्रवाणीमधील चांगले शैक्षणिक साहित्य पुनर्जिवत करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, अभ्यासात अडचणी येताहेत? मग ही बातमी वाचाच!

४२६ तज्ज्ञ समुपदेशक
कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने यु-ट्युब, फेसबुक लाईव्हमार्फत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी ४२६ तज्ज्ञ समुपदेशक उपलब्ध करून दिले आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना, आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसोबत 2 हजार 905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार

शिक्षणमंत्री म्हणाल्या 

  • किशोरची वार्षिक वर्गणी ५० रुपये करणार 
  • वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी बालभारतीने ग्रंथालय सुरू करावे
  • कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने चौथीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील
  • शिष्यवृत्तीच्या मानधनाची फेररचना

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balbharatis independent channel throughout the year Varsha Gaikwad