पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना, आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसोबत 2 हजार 905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार

पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना, आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसोबत 2 हजार 905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार

मुंबई,ता. 27 : राज्यातील कोकण, पुणे सातारा जिल्ह्यासह इतर पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसमवेत सुमारे 2 हजार 905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आदरातिथ्य क्षेत्रातील विविध घटकांसमवेत सुमारे 2 हजार 905 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.

या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या (maharashtra) विविध भागात हॉटेल, रिसॉर्ट, वेलनेस सेंटर्स, हेल्थ फार्म, थिम पार्क, मेडीटेशन सेंटर, रोपवे, स्विमींग पूल, हॉटेल स्पा, हेल्थ क्लब, बोटींग आदी विविध पर्यटन सुविधांची निर्मिती होणार आहे. शिवाय यातून सुमारे 6 हजार 754 इतक्या रोजगाराची निर्मिती देखील होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृहातील कार्यक्रमात मांडके अँड मांडके ग्रुप (असगोली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), महर्षी वेदीक हेल्थ प्रा.लि. (वहनगांव, ता. मावळ, जि. पुणे), मेसर्स शिवाई कृष्णा रोडवेज (सिंहगड, पुणे), हॉटेल नागपूर अशोक (लक्ष्मी नगर, नागपूर), अॅटोमॅटीक होटेल्स अँड रिसॉर्टस् प्रा.लि. (सातपूर, नाशिक), ब्लू शाईन हॉस्पिटॅलिटी (मुनगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), बीच कॉटेजेस (मोरवे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), ओशन व्हू रिसॉर्टस् (मुनगे सदेवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), निलकंठ लेइझर एलएलपी (हातगड, ता. सुरगणा, जि. नाशिक), लेक व्ह्यू व्हेन्च्युअर्स (टाकळी सीम , नागपूर), साईओ इन्फ्रा (जावळी, महाबळेश्वर), मेसर्स ट्रायोटा व्हेन्च्युअर्स (चिखलठाणा औद्योगिक क्षेत्र, जि. औरंगाबाद), श्रीश्री इन्फ्रान्स्ट्रक्चर (मेहरुन, जि. जळगाव) या कंपन्यांबरोबर विविध प्रकल्प, आदरतिथ्य उद्योग यांना चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले. 

या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी तसंच शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध धोरणे, योजनांचा त्यांना लाभ, सवलती मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प जून 2022 ते 2024 पर्यंत पूर्ण होणार आहेत.

यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्य शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापुढील काळातही या क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलू. त्याशिवाय शासनाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर केलं आहे. कॅराव्हॅन पर्यटन धोरण लवकरच जाहीर होत आहे. या सामंजस्य करारातून राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक होत आहे. यातून राज्याच्या सर्वच भागात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला मोठी चालना मिळेल.

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. शासनामार्फत राज्यातील सर्व विभागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यात येईल. सर्व विभागांमध्ये पर्यटन महोत्सवासारखे उपक्रम राबविण्यात येतील. शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्याने तसंच यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी केल्याने राज्यात या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढं यावं, शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. 

boost to the tourism in maharashtra aaditya thackeray signed MOUs worth 3 thousand crore

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com