''....नाहीतर आम्हीच 'त्यांना' संपवू, महाराष्ट्रातील दंगलीवर नितेश राणेंचा इशारा'' | Nitesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane

....नाहीतर आम्हीच 'त्यांना' संपवू, नितेश राणेंचा इशारा

मुंबई : त्रिपुरातील हिंसाचाराचे (Tripura violence) पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत आज मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान या घटनेवर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीय. भाजप नेते नितेश राणे (bjp nitesh rane) यांनी सकाळी ट्विट करत सरकार तसच रजा अकादमीला (raza academy) टार्गेट केलंय

रजा अकादमीवर टार्गेट

महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये काल दंगलसदृश्य स्थिती होती. ह्या सर्व घटनेच्या पाठीमागे रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशारा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिलाय. राणे यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे. नितेश राणे हे सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कालच एसटी कामगारांच्या संपावरुनही सरकारला विशेषत: परिवहन मंत्री परबांना चांगलंच खडसावलं होतं. त्यानंतर त्यांच्या टार्गेटवर आता रजा अकादमी असल्याचं दिसतंय?

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
.‘महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहतं, बघत बसतं. सरकारनं एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू’.

हेही वाचा: अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री

त्रिपुरामध्ये जमावानं मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात
त्रिपुरामध्ये जमावानं मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ काल विविध ठिकाणी मुस्लिम मोर्चे काढले गेले. त्यात अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला. अमरावतीत तर जमावानं 20-20 दुकानं फोडली, दुचाकी तोडल्या. पोलीसांवर दगडफेक केली. बघता बघता महाराष्ट्राच्या काही शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. भिवंडी-नांदेडमध्ये रजा अकादमीच्याच काही तरुणांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केल्याचा आरोप आहे. नांदेडच्या एसपींनी ह्या घटनेला दुजोरा दिलाय.

loading image
go to top