
कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने आषाढी वारीसाठी नियमावली जारी केली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
'ज्ञानेश्वर, तुकारामांच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महागात पडेल'
कऱ्हाड (सातारा) : आळंदीवरुन पंढरपूरला पायी वारीने (Ashadhi Wari) जाण्यासाठी निघालेल्या व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, किर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी पुण्याच्या (Pune Police Station) तापकीर वाडीतून (Tapkir Wadi) ताब्यात घेतलं होतं. त्यांना आज कराडच्या करवडी येथील त्यांच्या गोपालन केंद्रात (Gopalan Kendra) पोलिसांनी आज शनिवारी आणले. तेथे बंडा तात्या यांनी वारकरी संप्रदायाचे चाकोरीबद्ध चाललेले आंदोलन पोलिसांनी मोडीत काढले असून ज्ञानेश्वर, तुकारामांच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला. (Bandatatya Karadkar Criticizes Thackeray Government From Pandharpur Ashadhi Wari Satara Marathi News)
कोरोना महामारीमुळे (coronavirus) राज्य सरकारने आषाढी वारीसाठी नियमावली जारी केली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारचा निर्णय नाकारुन बंडातात्या यांनी पायी वारीसाठी निघाले होते. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे बंडातात्या कराडकर यांनी आळंदी येथे जाहीर केले होते. त्यानुसार, आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी त्यांच्यासोबत पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांनी त्यांनाही दिगी येथील संकल्प मंगल कार्यालयात ताब्यात घेतले. त्यानंतर बंडातात्या यांना पुणे पोलिसांनी कराड तालुक्यातील करवडी येथील त्यांच्या गोपालन केंद्रात आणून कराड पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
हेही वाचा: पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

Bandatatya Karadkar
त्याबाबत बोलताना बंडा तात्या कराडकर म्हणाले, पोलिसांनी घेतलेला निर्णय हा त्यांचे वरिष्ठांचे आदेश देतात त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली आहे. वारकऱ्यांच्या बाबत शासनाने घेतलेली भूमिका निषेधार्ह आहे. वारकर्यांची आंदोलन गुंडाळण्याची ही जी असुरी पद्धत आहे, त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल. माझी भूमिका कोणी समजून घेतली नाही. आमच्या भूमिकेबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया चालू आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर संकट आहे, तरीही आग्रह का धरला आहे, प्रश्न उपस्थित केला जात आहे. 29 मार्च पासून आम्ही शासनाचा पाठपुरावा करत गेले तीन महिने झाले. किमान पन्नास लोकांना पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी वारंवार विनंती शासनाकडे केली. परंतु, शासनाला यामध्ये कोणताही पाझर फुटला नाही. शेवटी आम्ही आव्हान दिल्याप्रमाणे काल सायंकाळी सात वाजता आमच्या नियमाप्रमाणे पायी वारी सुरू केली. तेथे आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या कराड येथे गो-पालन केंदात स्थानबद्ध केलेले आहे. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना उग्र निदर्शने करु नये, असेही आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.
Bandatatya Karadkar Criticizes Thackeray Government From Pandharpur Ashadhi Wari Satara Marathi News
Web Title: Bandatatya Karadkar Criticizes Thackeray Government From Pandharpur Ashadhi Wari Satara Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..