
Thackeray Shivsena: संजय राठोडांना पर्याय? बंजारा समाजाच्या 'या' मोठ्या नेत्याने बांधलं शिवबंधन
मुंबई: शिवसेना फुटल्यापेक्षा जास्त वाढली आहे. पूर्वीपेक्षा शिवसेना अधिक मजबूत होत चालली आहे. जुने आणि जाणते आजदेखील माझ्यासोबत आहेत. नवनवीन मजबूत लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. गर्दी वाढत आहे, असं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केलं.
बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. अनिल राठोड यांच्या रुपाने उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाच्या नेतृत्वासाठी पर्याय शोधला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज अनिल राठोड यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. संजय राठोड यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांना मंत्रिपदही मिळालं आहे.
हेही वाचाः वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अयोध्येत महाराष्ट्र भवन करणार, अशी घोषणा मी केली होती. त्याही घोषणेला स्थगिती दिली असली तर माहिती नाही. सध्याचं सरकार मुंबईत कर्नाटक भवन बांधत असतील तर अवघड आहे.