esakal | "मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला तर समाज आमदारकीचाही राजीनामा घेणार"

बोलून बातमी शोधा

Banjara community will take resign of MLA post of sanjay rathod said jitendra maharaj }

राजीनामा प्रकरण इथेच संपलं नाहीये. आता बंजारा समाज पोहरादेवीमध्ये संजय राठोड यांना आमदारकीचाही राजीनामा द्यायला लावणार का? 

"मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला तर समाज आमदारकीचाही राजीनामा घेणार"
sakal_logo
By
अथर्व महांकाळ

यवतमाळ :  टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री संजय राठोडयांच्यावर आरोप होत होते. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स आणि फोटोमुळे संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले होते. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यायचं पार्श्वभूमीवर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्त केला. मात्र राजीनामा प्रकरण इथेच संपलं नाहीये. आता बंजारा समाज पोहरादेवीमध्ये संजय राठोड यांना आमदारकीचाही राजीनामा द्यायला लावणार का? 

बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारू नये असं म्हंटलं होतं. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला तर धर्मपीठावर म्हणजे पोहरादेवी इथे आम्ही संजय राठोड यांना आमदारकीचाही राजीनामा द्यायला लावू असंही जितेंद्र महाराज यांनी म्हंटल होतं. म्हणूनच आता जर मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा स्वीकारला तर संजय राठोड हे आमदारकीचाही राजीनामा देतील का हा प्रश्न उपस्थित होतोय. 

हेही वाचा - Breaking | पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून दररोज संजय राठोड यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असल्याने महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा राजीनाम्यासाठी सेनेवर दबाव असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. तसेच पक्षाची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे उद्या संजय राठोड मंत्रिपदाचा राजीनामा दिला असावा. 

राठोडांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर? 

संजय राठोड हे यवतमाळ- वाशीम या विदर्भाच्या भागांतील शिवसेनेचे  मोठे नेते आहेत. तसंच शिवसेनेचं विदर्भात फारसं अस्तित्व नसताना संजय राठोड हे विदर्भात शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत. त्यामुळे जर संजय राठोड यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला तर विदर्भ शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. तसंच पापपुढे पक्षबांधणीसाठी शिवसेनेला अडचणी येऊ शकतात.  

नक्की वाचा - काँग्रेस करणार विदर्भावर ‘फोकस’; व्होट बँक पोखरली, चार उपाध्यक्षांची नियुक्ती

त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारतील का? आणि स्वीकारलाच तर महंतांच्या म्हणण्याप्रमाणे राठोड आमदारकीही सोडतील का? हे दोन पुढे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ