बॅंक कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण रोखण्यासाठी आणि वेतनासह इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स या संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी (ता. २६) हजारो बॅंक कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाल्याने सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला. आठवडाभरात दुसऱ्यांदा संपामुळे बॅंकिंग सेवा ठप्प झाल्याने ग्राहकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नऊ संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने आजच्या संपाची हाक दिली होती. युनियन्सचा प्रभाव असलेल्या एसबीआयसह प्रमुख सार्वजनिक बॅंकांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते. राजधानी दिल्लीत संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक क्षेत्रातील २१ बॅंकांचे जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झाले होते. यामुळे सार्वजनिक बॅंकांमधील रोखीच्या आणि क्‍लिअरिंगच्या व्यवहारांवर परिणाम झाला. 

या वेळी झालेल्या सभेला देविदास तुळजापूरकर, सुभाष सावंत, रामनाथ के. पी., माथाप्रसाद त्रिपाठी आदी कामगार नेत्यांनी संबोधित केले.

Web Title: Bank Employee Work Close Agitation