Accident : वारीच्या पहिल्याच दिवशी एसटीचा भीषण अपघात; वारकरी जखमी

पंढरपूरच्या आषाढी वारीला आजपासून सुरूवात
Accident
Accident

पंढरपूरच्या आषाढी वारीला आजपासून सुरूवात झाली आहे. पण पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर मार्गावर भोरवाडीफाटा येथे एसटी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा वारकरी जखमी झाले आहेत. (Baramati Accident News st and pickup pandharpur highway )

पंढरपूरहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुणे कडून वाल्हेकडे निघालेल्या पिकअप टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार, एसटीचा (ST) टायर फुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये एसटीतील 6 जण जखमी झाले आहेत. यातील एका प्रवाशांच्या पायाचे हाड मोडले असून एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमींना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये वारकऱ्यांचाही समावेश आहे. हे वारकरी आळंदीसाठी निघाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार पालखी महामार्गावर जेजुरी जवळील भोर वाडी फाटा येथे वारकऱ्यांना घेऊन जाणारी एस.टी बस आणि कोंबड्यांची वाहतूक करणारा पीक अप यांची सामोरा समोर धडक झाली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com