
बारामती : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी शेंडे हीची हाँगकाँग येथे होणाऱ्या बाउहीनिया कप आंतरराष्ट्रीय युवा नेटबॉल स्पर्धेसाठी भारतीय नेटबॉल संघात निवड झाली आहे. तर याच महाविद्यालयाची विद्यार्थीनी शरयू जगताप हीची या आंतरराष्ट्रीय संघाच्या संघव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.