सोनाक्षी सिन्हाच्या चौकशीचा बारामती न्यायालयाचा आदेश 

sonakshi-sinha
sonakshi-sinha

भवानीनगर -  दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीदरम्यान दोन महिन्यांपूर्वी वाल्मीकी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चौकशीचा आदेश बारामती शहर पोलिसांना दिला आहे. 

याप्रकरणी विश्वास उद्धव लालबिगे यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. आज त्याची सुनावणी न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांच्यासमोर चालली. लालबिगे यांच्या वतीने ऍड. हेमचंद्र मोरे यांनी युक्तिवाद केला. दोन महिन्यांपूर्वी सोनाक्षी सिन्हा हिने दूरचित्रवाणीवरील एका मुलाखतीदरम्यान विमानतळावरील सफाई कामगारांना उद्देशून वाल्मीकी समाजाचा अपमान होईल असे शब्द वापरल्याची तक्रार लालबिगे यांनी पोलिसांकडे ऑनलाइन दिली होती. त्याचा पुढे तपास झाला नाही; म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून न्यायाधीशांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यात भादंवि कलम 202 अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल 30 नोव्हेंबरपर्यंत दाखल करावा, असे आदेशात म्हटले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com