Baramati News: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बारामती कोर्टात 30 एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत

baramati
baramatiesakal

BARAMATI: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार बारामती न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या रविवारी (ता. 30) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

baramati
Palghar Case : साधूंच्या हत्येबाबत महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय; सुप्रीम कोर्टात दिली 'ही' माहिती

या लोक अदालतमध्ये प्रलंबित मोटार वाहन नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, वीज वितरण कंपनी, दिवाणी, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 320 अनुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाऊन्सची प्रकरणे अशी न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे ठेवलेली आहेत.

baramati
Barsu Refinery Protest : 'बारसु'मध्ये जमिनी कुणाच्या? उदय सामंतांचं नाव घेऊन संजय राऊत म्हणाले...

बँक, वीज कंपनी, महानगरपालिका व ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टीची तसेच विविध वित्तीय संस्थाची व मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीकरीता ठेवण्यात आलेली आहेत.

नागरिकांना आपली प्रकरणे लोकन्यायालयामध्ये तडजोडीकरीता ठेवावयाची असल्यास त्यांनी संबंधित न्यायालयामध्ये किंवा बारामती तालुका विधी सेवा समितीमध्ये संपर्क साधून आपली प्रकरणे लोकन्यायालयामध्ये ठेवावीत, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश जे. पी. दरेकर व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com