Barsu Refinery : ग्रामस्थांनी घातलं सरकारचं श्राद्ध! मुंडन केलं, बोंबा मारल्या; म्हणाले आम्ही जिवंत असेपर्यंत...

Barsu Refinery
Barsu RefinerySakal

बारसू (रत्नागिरी) : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीसाठी लागणारे माती परिक्षणाचे काम संपले असून या रिफायनरीला असलेला ग्रामस्थांचा विरोध कायम आहे. काहीही झालं तरी रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही यावर पंचक्रोशीतील ग्रामस्थ ठाम असून आज बारसू - सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जबरदस्तीने, दडपशाही करून रिफायनरी राबवू पाहणाऱ्या सरकारचे श्राद्ध घातले.

दरम्यान, ज्या ठिकाणी माती परीक्षण केले गेले अशा एका बोअर जवळ हे श्राद्ध घातले गेले. यावेळी ग्रामस्थांनी पिंडदानाचा कार्यक्रमही पार पाडला. "सरकार" असं लिहिलेली पाटी ठेवून सरकारच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Barsu Refinery
Viral Video : 'भूकंप झाला तरी चालेल पण नाचायचंच'! नवरीचा भर पावसात छत्री घेऊन डान्स

यावेळी ग्रामस्थांनी मुंडन करून घेत भर उन्हात सरकारचा निषेध केला. तर 'एकच जिद्द रिफायनरी रद्द' हे घोषवाक्य काळ्या शाईने पाठीवर लिहून घेत आम्ही रिफायनरी रद्द वर ठाम आहोत हे ठणकावून सांगितलं आहे.

"आज आम्ही सरकारचं पिंडदान केलं आहे. कारण सरकारला असं वाटतंय की आम्ही माती परिक्षण केलं म्हणजे रिफायरी झाली. पण सरकारने या भ्रमात राहू नये. तुम्ही आमच्यावर दडपशाही केली या निषेधार्थ आम्ही तुमचं पिंडदान केलं आहे" असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे.

Barsu Refinery
Viral Video : मित्रासाठी कायपण! केकसाठी केली चोरी, बेकरीतच केलं सेलिब्रेशन; घटना CCTV मध्ये कैद

कोकणाला जे निसर्गाचं वैभव लाभलं आहे ते उध्वस्त करण्यापेक्षा सरकारने कोकणाच्या पर्यटनावर शाश्वत विकास करायला पाहिजे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाचा विकास करायला हवा. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि जैवविविधतेमुळे येथे पर्यटनासाठी अनुकूल वातावरण आहे. पण रोजगारनिर्मितीच्या नावाखाली कोकण उध्वस्त करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com