UPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना 'बार्टी'तर्फे ५० हजारांचे अर्थसहाय्य; वाचा सविस्तर!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

बार्टीमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत एकरकमी 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. 

Success Story : पहिल्यांदा जज, मग आयपीएस त्यानंतर कलेक्टर!​

बार्टीमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा चार ऑक्‍टोबर रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 23 ऑक्‍टोबरला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. 

बार्टीमार्फत मुख्य परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर पात्रतेचे स्वरूप तपासून घ्यावे. तसेच, अर्जासोबत आवश्‍यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जातील ई-मेलवर आठ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज पाठविण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BARTI will provide financial assistance of Rs 50000 to students who passed UPSC pre exam