esakal | Success Story : पहिल्यांदा जज, मग आयपीएस त्यानंतर कलेक्टर!
sakal

बोलून बातमी शोधा

IAS_Siddharth_Sihag

सिद्धार्थचे शिक्षण आणि आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. मी आयएएस अधिकारी होऊन समाजाची सेवा करीन, एवढं एकच स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं.

Success Story : पहिल्यांदा जज, मग आयपीएस त्यानंतर कलेक्टर!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

UPSC Success story : आज आपण एका अशा प्रशासकीय अधिकाऱ्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या परिश्रमाच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले. सरकारी नोकरी मिळवणे हे स्वत: ऑलिम्पिक मेडल मिळवण्यासारखे झाले आहे. आणि त्यातही नागरी सेवेसारखी नोकरी मिळवणे हे एक मोठे यश आहे. आज ज्या आयएएस ऑफिसरविषयी आपण माहिती घेणार आहोत, त्याने आपले स्वप्न पूर्ण होईपर्यंत वेगवेगळे पर्याय निवडले पण ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नात कधीच खंड पडू दिला नाही.

नोकरी गेली काय करायचे? कसे सामोरे जाल या प्रसंगाला​

''समाधान आणि जिद्द दोन्हीमध्ये खूप फरक आहे. काहीही मिळवणे आणि इच्छेला पेटून एखादी गोष्ट मिळवणे हेदेखील खूप अवघड आहे. एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आनंद होतो, पण त्यासाठी मनात ते मिळविण्याची इच्छा असली पाहिजे. पर्याय निवडा आणि स्वीकार करा, पण जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत मेहनत करत राहा,'' असं तो सांगतो.

ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत, तो अधिकारी म्हणजे सिद्धार्थ सिहाग. हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील सिवानी बोलानमध्ये सिद्धार्थचा जन्म झाला. पंचकुलामध्ये त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सिद्धार्थची पत्नी रुक्मिणी ही देखील आयएएस आहे. जी डुंगरपूर जिल्हा परिषदेची सीईओ होती, आता बूंदीमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहे. सिद्धार्थचे वडील दिलबाग सिंह चीफ टाउन प्लानर म्हणून सेवानिवृत्त झाले. तर छोटा भाऊ दिल्ली कोर्टामध्ये न्यायाधीश आहे. 

जपानच्या चित्रपट उद्योगातील संधी

सिद्धार्थचे शिक्षण आणि आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. मी आयएएस अधिकारी होऊन समाजाची सेवा करीन, एवढं एकच स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. यासाठी त्याने परिश्रम घेतले आणि सर्व प्रकारच्या परीक्षा दिल्या. आयएएस होण्यासाठी प्रवास करताना त्याला न्यायालयीन सेवेत जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांची नागरी सेवेत निवड झाली. पण रँकिंग कमी असल्याने त्यांना पोलिस सेवेत दाखल व्हावे लागले. सिद्धार्थला आयएएस व्हायचे होते, त्यामुळे त्याने नोकरीसोबत परीक्षेची तयारीही सुरूच ठेवली होती. 

यश कसे मिळवायचे
जर तुम्ही एखाद्या लक्ष्यासाठी कठोर परिश्रम घेऊन परीक्षेची तयारी केली, तर तुमचे ध्येय नक्कीच साध्य होईल. तुम्ही ज्याचा विचार करता, ते यश तुम्हाला नक्की मिळतेच. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशासकीय अधिकारीच व्हायचं हे सिद्धार्थने मनाशी पक्कं केलं होतं.

Positive Story - महिलेनं दागिने विकून जीम उघडली; फिटनेसनं मिळवून दिली जगात ओळख​

दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सिद्धार्थची दिवाणी कोर्टात मेट्रोपोलियन दंडाधिकारी म्हणून निवड झाली होती. त्याचे ट्रेनिंग सुरू असतानाच आयएएसचा निकाल लागला आणि सिद्धार्थला १४८ वी रँक मिळाली. आयपीएससाठी निवड झाल्याने त्याला हैदराबादच्या राष्ट्रीय पोलिस अॅकॅडमीमध्ये जावे लागले. पण आयएएस व्हायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतरची यूपीएससीची परीक्षा पूर्ण तयारीनिशी दिली, त्या परीक्षेत सिद्धार्थने ४२ वी रँक मिळवली. यासाठी कोणतीही कोचिंग लावली नाही, फक्त नियमित अभ्यास हाच एक फंडा वापरला. 

सिद्धार्थ सांगतो, तीनही परीक्षांसाठी कोणतेही कोचिंग क्लासेस लावले नव्हते. आयएएसच्या तयारीसाठी त्याने इंटरनेटचा आधार घेतला. ब्लॉग, इंटरव्ह्यूची खूप मोठी मदत झाली. जनरल नॉलेजवर पूर्ण फोकस असला पाहिजे. नागरी सेवा परीक्षेसाठी सामान्य ज्ञान सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परीक्षेत यश मिळवण्यासाठी सामान्य ज्ञानवर विशेष कमांड असायला हवी, याकडे सिद्धार्थने लक्ष्य वेधले.

- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)