Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

Bay of Bengal Deep Depression Intensifies : बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनची तीव्रता वाढली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर परिणाम होण्याची शक्यता असून, विदर्भात २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

esakal

Updated on

Heavy Rain Forecast for Vidarbha : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘डीप डिप्रेशन’ची तीव्रता वाढली असून, ही हवामान प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (२३ सप्टेंबर) रात्री उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर या प्रणालीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता (Bay of Bengal Weather System) आहे. त्यामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागांत मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com