esakal | 'नेता राहुल गांधी जैसा हो! ही घोषणा बैलांनाही आवडली नाहीये' - फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis

'नेता राहुल गांधी जैसा हो! ही घोषणा बैलांनाही आवडली नाहीये' - फडणवीस

sakal_logo
By
विनायक होगाडे

नागपुर: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे पत्रकारांना दिली. विधानसभेतील अध्यक्षपदाबाबतच्या प्रश्नावर त्यांनी म्हटलं की, भास्करराव जाधवांना अध्यक्षपदासाठी सदिच्छा आहेत. त्यांनी निष्पक्षपणे पदावर रहावं आणि पदाची मान उंचवावी. आघाडीमध्ये अध्यक्षपदासाठी एकमत असतं तर त्यांनी निवडणूक लावली असती, मात्र ते एकमत नसल्यानेच ही निवडणूक लावली जात नाहीये.

पुढे ते प्रीतम मुंडेंना केंद्रात मंत्रीपद न मिळाल्याबाबत नाराजी असल्याच्या चर्चांना उत्तर देताना म्हटलं की, प्रीतम मुंडेना मंत्रीपद दिलं नाही म्हणून पंकजा मुंडे नाराज असल्याचा चर्चा वास्तवाला धरुन नाहीत. पंकजा मुंडे नाराज नाहीत, हे त्यांनीच सांगितलंय, मीही सांगितलंय, बाकीच्यांना काय पतंगबाजी करायची आहे, ती त्यांनी जरुर करावी.

हेही वाचा: 'दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी नोकरी-निवडणूक लढवता येणार नाही'

स्पप्निल लोणकर आत्महत्त्या प्रकरणाबाबत ते म्हणाले की, एमपीएससीबाबत हे सरकार गंभीर नाही, स्वप्निल लोणकरच्या आत्महत्त्येनंतरही सरकारने फक्त स्टेटमेंट दिलेत. बाकी दिलासा देणारं काहीही केलं नाहीये.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने केलेल्या बैलगाडी आंदोलनात बैलगाडी तुटल्याची घटना घडली आहे. त्याबाबत ते म्हणाले की, व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईल की, राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं आणि ही घोषणा दिल्याचं बैलांनाही आवडलं नसावं त्यामुळे ही बैलगाडी तुटली असावी.

चंद्रपूरात वडेट्टीवारांची दारु विक्रेत्यांनी पूजा केली आहे, यावर ते म्हणाले की, या सरकारमध्ये अशाच प्रकारची पूजा होऊ शकते. वेगळ्या प्रकारची पूजा होऊ शखतनाही. उद्या एखादा सट्टेवाला अशाच प्रकारची पूजा करु शकतो. तेव्हा आश्चर्य वाटूघेऊ नका

हेही वाचा: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का

केंद्रात सहकार खातं तयार केलं गेलंय, त्याबाबत ते म्हणाले की, सहकारात ज्यांनी चांगलं का मकेलंय ते सगळे लोक सहकार खात्याच्या निर्णयाने आनंदी असतील. मात्र ज्यांनी सहकार खात्याचा स्वाहाकार केलाय त्यांचं धाबे दणाणले आहेत. अमित शहा स्वत सहकारातून पुढे आलेत , त्यांना जाण आहे., ते आधी सहकारात होते मग राजकारणात आलेत त्यामुळेच हा निर्णय योग्य आहे.

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तयार राहायचं आवाहन केलंय, याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हे सरकार मध्यावधी निवडणुका घेणार नाही. कारण त्यांना माहितीय की या सरकार बद्दल लोकांत नाराजी आहे. त्यामुळे हे सरकार असं काही करणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

loading image