esakal | बारावीच्या मुल्यांकनासाठी सूत्र ठरलं; रविवारी पुन्हा बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

HSC results

बारावीच्या मुल्यांकनासाठी सूत्र ठरलं; रविवारी पुन्हा बैठक

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून सूत्र निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी अकरावीमध्ये मिळवलेल्या गुणाचा सर्वाधिक विचार केला जाणार आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी जे धोरण ठरवण्यात आलं त्याच धर्तीवर बारावीसाठीही धोरण तयार करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Became formula for assessment of HSC exam Imp meeting again on Sunday)

हेही वाचा: वयोवृद्ध कैद्यांच्या सुटकेसाठी मेधा पाटकरांची सुप्रीम कोर्टात याचिका

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दोन दिवसापूर्वीच बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी 30:30:40 असा गुणांचा फॉर्मुला ठरवला आहे. त्याचपार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी परीक्षेच्या निकालासंदर्भात हालचालींना वेग आला आहे.

उद्या होणार महत्वाची बैठक

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात आणि त्याची कार्यपद्धती जाहीर करण्याची मुख्य जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी महत्त्वाची बैठक रविवारी, २० जून रोजी होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मागील काही दिवसात शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी त्यांच्या अकरावी आणि दहावीत मिळालेल्या गुणांचा तपशील गोळा करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला, त्याच धर्तीवर बारावीचा निर्णय घेतला जाणार आहे.

अकरावीच्या गुणांचा प्रामुख्याने होणार विचार

राज्यात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला अधिक विद्यार्थी असतात, शिवाय राज्यातील विभागीय मंडळे आणि अभ्यासक्रमाच्या पद्धती वेगळ्या असून त्या सर्व पद्धतीचा मंडळाकडून नुकताच आढावा घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अकरावीच्या वर्गात मिळालेले गुण याचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. यासाठी उद्या राज्य शिक्षण मंडळाचे प्रमुख अधिकारी त्यासोबतच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अधिकारी आणि शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकारी यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत बारावीच्या निकाला संदर्भातील फार्मुला कधीपर्यंत जाहीर करायचा यासाठीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील उच्च स्तरीय अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.

loading image