
Beed Sandeep Kshirsagar: अजित पवार आता बीडमध्ये मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत.. आता ते एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या तयारीत दिसताहेत. एक म्हणजे काका शरद पवार आणि दुसरे म्हणजे धनंजय मुंडे. खरंतर धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत अव्वल स्थानी होते. पण, जसं संतोष देशमुख हत्याकांड झालं तसं धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. आणि पालकमंत्रीपद दूर गेलं. त्यांना पालकमंत्री पद मिळू नये यासाठी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी दबाव निर्माण केला होता. त्यानंतर अजितदादांनी स्वत: बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वीकारलं आणि बीड जिल्ह्यातील प्रशासनाच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या.