
Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या सरपंच खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडलाही आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. यानंतर आज त्याला बीड सत्र कोर्टात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणी सुरू होती. यात अखेर वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.