
वाल्मीक कराडला मंगळवारी केज सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून त्याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. यामुळे बुधवारी पुन्हा एकदा त्याला बीडच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला रुग्णालयात नेलं होतं. सीआयडीने केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे. वाल्मीक कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार नाही. वाल्मीक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात होणार आहे.