
बीडमध्ये निवृत्त पोलिस फौजदारला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. दहा ते पंधरा णांनी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला खोलीत डांबले आणि दोन तास बेदम चोप दिला. पिण्यासाठी पाणी मागितले असता त्याच्या तोंडावर लघुशंका केली. माजलगावमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या प्रकरणामुळे आरोपींना पोलिसांचा धाक उरलाय की नाही? असा सवाल केला जात आहे.