
अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते, मुस्लीमही आधी हिंदू होते: रामदास आठवले
नाशिक : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) आपल्या भाषणाच्या शैलीमुळे चर्चेत असतात. त्यांनी प्रत्येक विषयावर रचलेल्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी सगळेच बौद्ध होते असा दावा केला आहे.
(Ramdas Athavale On Religion)
सध्या देशात असलेले ब्राम्हण, क्षत्रिय, मुस्लीम आणि शुद्र हे सगळेच आधी बौद्ध होते असा दावा त्यांनी केला आहे. सर्वांत आधी जगात बौद्ध धर्म होता त्यानंतर हिंदू आला, त्यानंतर मुस्लीम असं करत सर्व धर्म तयार झाले. बौद्ध हा सर्वांत जुना धर्म आहे. मुस्लीम धर्म हा सुद्धा हिंदू धर्मापासून तयार झाला आहे असा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा: जैसे ज्याचे कर्म तैसे...; प्रियसीचा खून करून मृतदेह पुरताना प्रियकराचा मृत्यू
सध्या राज्यात भोंग्याच्या प्रश्नावरून वाद पेटला असून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. देशात नरेंद्र मोदी हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी भूमिका मांडत असताना काही लोकं सध्या वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यावरून घेतलेली भूमिका योग्य नाही असं ते म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी अंगावर शाल पांघरली आहे, तर ती चांगली गोष्ट आहे कारण भगवा रंग हा शांततेचं प्रतीक असून गौतम बुद्धाच्या काळातही बौद्ध भिक्खूंच्या वस्त्रांचा रंगसुद्धा भगवाच होता म्हणून भगवा रंग हा वाद लावण्याचे प्रतीक नाही असं ते म्हणाले आहेत.
हेही वाचा: जैसा राजा वैसी प्रजा: राहुल गांधीनंतर कॉंग्रेस नेत्यांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल
राज्यातील प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष केले आहे. बेरोजगारी, महागाई असे प्रश्न असताना ठाकरे सरकार हे वादावर अडकले आहे. तसंच संजय राऊत हे मूळ प्रश्न सोडून उत्तरं देण्यात आपला वेळ व्यर्थ करत आहेत. राणा दाम्पत्याविरोधातही सरकार चुकीचं वागलं असून सरकार चुकीच्या पद्धतीने पुढे चालले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
"कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासूनच पटत नाही, शरद पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापणा केली तेव्हापासून त्यांचं पटत नाही. आता नाना पटोले म्हणतात की आमच्या पाठीत खंजीर खुपसला, जर तुमच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर त्यांनी आघाडी सरकारमधून बाहेर पडावं." असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
Web Title: Before 2500 Year All Are Baudhh Religion Ramdas Athavale
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..