
मुंबई : MPSC परीक्षांमध्ये होणाऱ्या मोठ्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं आता कोणताही परीक्षा फॉर्म भरताना उमेदवारानं आयोगानं दिलेल्या सुचनांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे, अन्यथा त्याचा उमेदवारांना नाहक त्रास होऊ शकतो. यासंदर्भात MPSCनं तीन पानी माहिती पत्रक प्रसिद्ध केलं आहे.