पत्रकार परिषदेआधी CM शिंदेंनी फडणवीसांच्या कानात हळूच विचारलं, वाचून दाखवू का? Video Viral

पत्रकार परिषद झाल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता
Eknath Shinde
Eknath Shinde Esakal

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी यांनी वीर सावरकर यांची खिल्ली उडवली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार प्रचंड आक्रमक झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबधी काल पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच काँग्रेससोबत महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेलाही (ठाकरे गटालाही) मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाब विचारला होता.

Eknath Shinde
Maharashtra Politics: अखेर पोटातलं ओठावर; 2019 मध्ये नेमकं काय घडलं? तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर 'आम्ही सावरकर' असा प्रोफाइल फोटो लावण्यात आला होता. सावरकरांसाठी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतलेल्या आक्रमक भूमिकेची बरीच चर्चाही झाली होती. मात्र, ही पत्रकार परिषद झाल्यानंतर सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Eknath Shinde
Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

कालच्या पत्रकार परिषदेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींवर टीका करताना राज्य सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडली. मात्र, हे सर्व बोलताना एकनाथ शिंदे हे अधुनमधून टेबलावर ठेवलेल्या कागदाकडे पाहत होते. त्यामधून काही मुद्दे एकनाथ शिंदे यांनी वाचून दाखवल्याचे बोलले जात आहे.

Eknath Shinde
Smriti Irani : 'कोर्टानं राहुल गांधींना 'या' कारणामुळं ठरवलं दोषी'; स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

त्यामुळे एकनाथ शिंदे हे स्वत:च्या मनातलं बोलत होते की लिहून आणलेलं स्क्रिप्ट वाचून दाखवत होते, याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. एकनाथ शिंदे हे भाजपने लिहून दिलेलं स्क्रिप्ट वाचतात, असा आरोप नेहमीच केला जातो. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांच्यासमोरील माईक खेचल्याचा व्हिडिओही अशाच प्रकारे व्हायरल झाला होता. आताच्या व्हिडिओमध्ये देखील मुख्यमंत्री शिंदे 'वाचून बोलू का?', असा प्रश्न फडणवीसांना विचारताना दिसत असल्याने विरोधकांना आणखी एक मुद्दा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com