लोकप्रिय नेता असल्याने माझ्यावर हल्ला : आठवले

वृत्तसंस्था
रविवार, 9 डिसेंबर 2018

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर काल (शनिवार) हल्ला करण्यात आला. त्यावर आज त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ''मी लोकप्रिय नेता असल्याने कदाचित कोणीतरी एखाद्या मुद्यावरून निराश झाला असेल. त्यामुळे माझ्यावर हा हल्ला केला असावा''.

अंबरनाथ येथे रामदास आठवले यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आज (रविवार) त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले, ''मी लोकप्रिय नेता आहे. त्यामुळे माझ्यावर कोणीतरी एखाद्या मुद्यावरून निराश असेल. मात्र, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा घटनास्थळी पोलिसांनी आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात केली नव्हती. मी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. याप्रकरणाची चौकशी केली जावी''.

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. या बंदला अंबरनाथमध्ये सकाळपासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: Being a popular leader thats why atttack on me says Ramdas Athavale