मधमाशा हल्ल्यात बेळगाव जिल्ह्यातील कणबर्गीत 30 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

बेळगाव - कणबर्गी येथील मधमाश्याच्या हल्ल्यात 30 जण जखमी झाल्याची घटना आज (ता. 21) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

बेळगाव - कणबर्गी येथील मधमाश्याच्या हल्ल्यात 30 जण जखमी झाल्याची घटना आज (ता. 21) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

कणबर्गी येथील सिद्धेश्वर देवस्थानाचा स्लॅब भरणी कार्यक्रम सुरु होता. त्यानिमित्त सुमारे दीडशे ते दोनशे नागरिक येथे आले होते. स्लॅबभरणी कार्यक्रमानंतर बांधकाम कामगाराने ड्रिल मशीनचा उपयोग करण्यास सुरू केला. त्यामुळे निर्माण झालेल्या कंपनांमुळे मधमाश्या पोळ्यावरून उठल्या. पोळ्यातून उठलेल्या या मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तेथून पळ काढला. पण, मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यात सुमारे 30 जणांवर जखमी झाले यात तीन महिला आणि चार-पाच लहान मुलांचाही जखमीमध्ये समावेश आहे. जखमीपैकी काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, 12 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी दोघे अत्यवस्थ आहेत. उर्वरिताची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Belgaum News 30 injured in attack of honey bee in Kanbargi

टॅग्स