वीज बचतीसाठी बेळगाव महापालिकेचा पुढाकार

वीज बचतीसाठी बेळगाव महापालिकेचा पुढाकार

बेळगाव - वीज बचतीसाठी शहर परिसरातील पथदीपांसाठी एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय महापालिका व हेस्कॉमने घेतला आहे. तसेच विजेचा अपव्यय टाळण्यासाठी पथदीप बंद व सुरू करण्यासाठी टायमरचा वापर करण्यात येणार आहे. सध्या शहरात नव्याने बसविलेल्या पथदीपांसाठी टायमरचा वापर करण्यात आला आहे. पुढील काळात सर्वच पथदीपांना टायमर बसविण्यात येणार आहेत. 

शहराचा समावेश स्मार्ट सिटीत केल्यानंतर एलईडी बल्बचा वापर अधिक प्रमाणात करण्याच्या सूचना आयुक्‍तांनी केल्या आहेत. सध्या शहर आणि परिसरात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील वीजवाहिन्यांचे जाळे कमी होणार आहे. सध्या शहराच्या अनेक भागांत भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले असून, काही भागांत सुरू आहे. आता पथदीप सुधारणा हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी एलईडी बल्ब व टायमरचा वापर केला जात आहे. 

फोर्ट रोड, किल्ला ते कणबर्गी, आरपीडी या भागात नव्याने बसविलेल्या पथदीपांसाठी टायमरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे, पथदीप वेळेत सुरू व बंद होण्यास मदत मिळणार आहे तसेच कर्मचाऱ्यांवरील भार कमी होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पथदीप सुरू व बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, अनेकदा पथदीप वेळेत सुरू बंद केले जात नसल्यामुळे वीज वाया जाते. भविष्यात हा प्रकार बंद होणार आहे. 

बेळगावचा समावेश स्मार्ट सिटीत करण्यात आल्यानंतर घरगुती वापर व इतर ठिकाणी एलईडी बल्बचा करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. एलईडी बल्बमुळे अधिक प्रकाश मिळतो व विजेची बचतही होते. त्यामुळे त्याचा वापर वाढणे आवश्‍यक आहे. पथदीपांसाठीही आता एलईडी बल्बचा वापर होत आहे. काही ठिकानी सोडियम व्हेपर बल्ब वापरले जात आहेत. मात्र, आगामी काळात एलईडी बल्बचा वापर वाढवला जाणार आहे.
- जी. एन. पाल, सहायक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com