सावगावच्या व्यक्तीचा मृतदेह मलप्रभेच्या पात्रात 

परशराम पालकर
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

खानापूर -  येथे मलप्रभेच्या पात्रात गुरूवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सावगाव येथील शट्टू आप्पाजी वाघवडेकर (वय 40) असल्याची खात्री आज पटली.

खानापूर -  येथे मलप्रभेच्या पात्रात गुरूवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सावगाव येथील शट्टू आप्पाजी वाघवडेकर (वय 40) असल्याची खात्री आज पटली.

नातेवाईकांनी खानापूर पोलिस स्थानकात धाव घेतली आहे. गुरूवारी सायंकाळी अधार पडल्यानंतर मृतदेह पाण्यातून काढणे शक्य झाले नाही. आज सकाळी हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यांनतर उतरीय पाहणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती खानापूर पोलीसांनी दिली.

निकटवर्तीयांकडून समजलेल्या माहितीनुसार रविवारपासून (ता. 28) शट्टू हे बेपत्ता होते. वडगाव पोलीस स्टेशनला या घटनेची  नोंद केली होती.  बऱ्याच वर्षापासून पोटाच्या विचाराने ते त्रस्त होते.  शस्त्रक्रिया करून घेण्याची गरज होती. याच विवंचनेत ते वावरत होते. यातूनच त्यानी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Belgaum News dead body found in Malaprabha river