औरंगाबाद इस्तेमासाठी निपाणीतून जादा बस 

विकास पाटील
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

निपाणी - औरंगाबाद येथे मंगळवार (ता. 20) ते सोमवार (ता. 26) अखेर होणाऱ्या इस्तेमासाठी निपाणी आगारातून खास बसेसची सोय केली आहे. प्रासंगिक करारानुसार प्रतिकिलो मीटर 37 रुपये प्रमाणे याची नोंदणी सुरु आहे. आजअखेर 10 बसेसची नोंदणी झाली आहे.

निपाणी - औरंगाबाद येथे मंगळवार (ता. 20) ते सोमवार (ता. 26) अखेर होणाऱ्या इस्तेमासाठी निपाणी आगारातून खास बसेसची सोय केली आहे. प्रासंगिक करारानुसार प्रतिकिलो मीटर 37 रुपये प्रमाणे याची नोंदणी सुरु आहे. आजअखेर 10 बसेसची नोंदणी झाली आहे.

महाराष्ट्रातून बससाठी मागणी वाढत आहे. त्यामुळे सौंदत्ती यात्रेपाठोपाठ आता औरंगाबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमातून निपाणी आगाराला चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. सलग उत्पन्न वाढीचा हंगाम लाभल्याने आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांतून समाधान व्यक्त केले.  

सौंदत्ती यात्रेपाठोपाठ आता औरंगाबाद येथे होणाऱ्या इस्तेमासाठी आगारातून खास बसेसची सोय केली आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन भाविकांना नवीन बसेस दिल्या जात आहेत. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. कोणतीही अडचण आल्यास आपल्याशी व आगाराशी संपर्क साधावा.
-एस. संदीपकुमार,
आगार व्यवस्थापक, निपाणी 

इस्तेमासाठी इचलकरंजी, मिरज, सांगली, विटा, तासगाव यासह अन्य शहरातून निपाणी आगारातील बसेसना मागणी होत आहे. यासाठी 54 आसनांच्या बस दिल्या जात आहेत. या बस निपाणी, कोल्हापूर, सातारा, निरा, लोणंद, अहमदनगरमार्गे औरंगाबादला जाणार आहेत. प्रासंगिक करार वगळता निपाणी आगारातून सकाळी 9 वाजता व रात्री 8 वाजता जादा बसेसवा आहे. त्यामुळे प्रवाशांचीही चांगली सोय होणार आहे. 

मुक्कामाचे दर रद्द केले असून प्रवासी, भाविकांना औरंगाबादला सोडून पुन्हा बस दुसऱ्या ठिकाणी प्रवासी आणण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांसह आगारालाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद मार्गासाठी आगारात नवीन दाखल झालेल्या बसेसच दिल्या जात आहेत. बरेच भाविक रात्रीच्यावेळी जात असल्याने रात्री 8 वाजता नव्याने बससेवा सुरु केली आहे.

 

Web Title: Belgaum News extra bus to Aurangabad Istemal