बेळगावातील मुचंडी शिवारात आगीत गवत गंजी खाक

विनायक जाधव
शुक्रवार, 23 मार्च 2018

बेळगाव -  मुचंडी शिवारात कापणीसाठी आलेल्या गवताला आग लागली. या आगीत साठवून ठेवलेल्या गवत गंजीनेही पेट घेतला. मुचंडी शिवारात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. गंजी जळाल्याने शेतकरी पुंडलीक बसरीकट्टी यांचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुपारी दोनच्या सुमारास मुचंडी शिवारात वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतला. याठिकाणी श्री. बसरीकट्टी यांनी साठवून ठेवलेल्या गंजीनेही पेट घेतला. यामुळे आगीचा अधिकच भडका उडाला. गंजीसह सुमारे अर्धा एकर परिसरातील करडही आगीत सापडले. याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती बेळगाव अग्नीशमन ठाण्याला कळविण्यात आली. पण, बंब पोहोचेपर्यंत संपूर्ण गवत जळाले होते. आग नेमकी कशामुळे लागली समजू शकले नाही. 

Web Title: Belgaum News fodder grass burn in Muchandi

टॅग्स