अथणी तालुक्यात स्कूलबस-दुचाकी अपघातात चार ठार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

अथणी - संकेश्‍वर-जेवरगी राज्य महामार्गावर खोतनट्टी (ता. अथणी) येथे स्कूल-दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात दुचाकीवरील तिघे व स्कूलबसचा चालक ठार तर 25 विद्यार्थी जखमी झाले.

अथणी - संकेश्‍वर-जेवरगी राज्य महामार्गावर खोतनट्टी (ता. अथणी) येथे स्कूल-दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात दुचाकीवरील तिघे व स्कूलबसचा चालक ठार तर 25 विद्यार्थी जखमी झाले.

गुरूवारी (ता. 18) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. दानाप्पा मगदूम, मनोज दोडमनी, आप्पासाहेब संभू मराठे (तिघेही रा. यलहडलगी, ता. अथणी) व बसचालक सिद्धगिरी सिद्धाप्पा पुजारी (रा. आरटाळ, ता. अथणी) अशी मृतांची नावे आहेत. 

ऐगळी फाट्यावरील माणिकप्रभू खासगी शाळेची बस मुलांना घेवून निघाली असता समोरुन आलेल्या दुचाकीस धडक झाल्याने हा अपघात झाला. या घटनेत दुचाकीवरील तिघांचा जागीच तर बसचालकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघात होताच जखमींना अथणी येथील सरकारी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या 6 विद्यार्थ्यांना उपचारासाठी मिरज येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ऐगळी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. 

Web Title: Belgaum News four dead in an accident