कोगनोळीजवळ अपघातातील वृद्ध महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्गावर बिरदेव माळ फाट्याजवळ अज्ञात वाहनाने सोनाबाई अप्पाजी गोरडे (वय 65, रा. कोगनोळी) या वृद्ध महिलेला रविवारी (ता. 14) दुपारी धडक दिली होती. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील दवाखान्यात दाखल केले होते. पण उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, सोनाबाई गोरडे या आपल्या मेंगाणे कोडी येथील शेतातून गावाकडे येत होत्या. राष्ट्रीय महामार्गावर आल्यावर अज्ञात वाहनाने जोराची घडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रूग्णालयात नेण्यात आले होते. पण रविवारी रात्रीच मृत्यू झाला. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून तपास पी. एस. आय. निगनगौंडा पाटील करीत आहेत. 

Web Title: Belgaum News old lady dead in an accident