‘कराड-निपाणी-बेळगाव’ रेल्वे मार्गाला गती देणार - रेल्वेमंत्री गोयल

अमोल नागराळे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

निपाणी - कराड-निपाणी-बेळगाव रेल्वे मार्गाच्या यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणाची माहिती येत्या १५ दिवसांत घेणार आहोत. सर्वेक्षणाचा अहवाल देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अहवालातील माहिती घेऊन या रेल्वे मार्गाच्या पुढील कामाला चालना देण्याची ग्वाही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आमदार शशिकला जोल्ले यांना दिली.

रेल्वेमंत्री एकसंबा दौऱ्यावर आल्यावर आमदार जोल्ले यांनी कराड-निपाणी-बेळगाव रेल्वेमार्गाबद्दल निवेदन देऊन याकामी गती देण्याची विनंती केली. 

रेल्वेमार्गाचे महत्त्व पटवून देताना आमदार जोल्ले म्हणाल्या, ‘‘निपाणी हे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील बाजारपेठेचे मोठे शहर आहे. शहराच्या बाजूने राष्ट्रीय महामार्ग गेल्याने परिसराचे आंतरराज्य व्यावहारिक संबंध मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वे मार्ग सुरू झाल्यास येथे दळणवळण व्यवस्था अधिक सोयीचे होईल. शिवाय येथील बाजारपेठेला अधिक महत्त्व प्राप्त होऊन आर्थिक उलाढाल वाढेल. ज्यामुळे येथील सामान्यांचे जीवनमान उंचावण्यासह अधिक समृद्ध होईल. यापूर्वी आपण रेल्वेमार्गाबद्दल पाठपुरावा केला असून आता त्याला गती द्यावी.’’

मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्या टप्प्यात या मार्गाच्या सर्वेक्षणाची माहिती घेतली जाईल, असे सांगितले. त्यानंतर त्वरीत या कामाबद्दल पुढील कार्यवाही करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडण्याची ग्वाही दिली.

यावेळी खासदार सुरेश अंगडी, आमदार महांतेश कवटगीमठ, लक्ष्मण सवदी, पी. राजीव, राजू कागे, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, शशिकांत नाईक, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, सुमित्रा उगळे, ॲड. संजय शिंत्रे, शहर भाजप अध्यक्ष जयवंत भाटले व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Rail Minister Piyush Goyal comment