बेळगावात समाजकंटकांनी लावली सात मोटारींना आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

बेळगाव - येथील जाधवनगरमध्ये घरासमोर लावलेल्या सात मोटारींना समाजकंटकांनी आग लावल्याची घटना आज पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बेळगाव - येथील जाधवनगरमध्ये घरासमोर लावलेल्या सात मोटारींना समाजकंटकांनी आग लावल्याची घटना आज पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जाधवनगरमधील कत्ती अपार्टमेंटसमोर लावलेली एक मोटार, येथून काही अंतरावर असलेल्या स्विमिंग पुलाजवळ लावलेल्या दोन मोटारी तसेच येथून पुढे शंभर मीटरवर लावलेल्या चार मोटारी अज्ञात समाजकंटकांनी पेटविल्या. यामध्ये मोटारीचा समोरील भाग, बॉनेट, प्लास्टिक व रबरी साहित्य जळाले. यामध्ये इनोव्हा, एर्टिगा, आय-२० सह अन्य किमती मोटारींचा समावेश आहे. आज येथील रहिवाशी उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ही आग नेमकी कशासाठी व कोणी लावली आहे याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Belgaum News seven cars burn by vermin