केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना बेळगावात काळे झेंडे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

बेळगाव - भारतीय घटनेबाबत केलेल्या व्यक्तव्याच्या विरोधात केंद्रिय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांना "काळे झेंडे' दाखवून आज (ता. 8) बेळगावात निदर्शने केली.

बेळगाव - भारतीय घटनेबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात केंद्रिय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांना "काळे झेंडे' दाखवून आज (ता. 8) बेळगावात निदर्शने केली.

मंत्र्याची मोटार अडवण्याचा प्रयत्न झाला. पण, पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे काहीकाळ चन्नम्मा चौकामध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, आंदोलन विविध दलित संघटनांच्या झेंड्याखाली झाले. 

भारतीय घटनेत दुरुस्ती अपेक्षित आहे. सेक्‍यूलर पद घटनेतून हटविण्याची गरज असल्याचे विधान करून वाद अंगावर ओढावून घेणारे केंद्रिय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे आज (ता.8) बेळगाव दौऱ्यावर होते. चन्नम्मा चौकात कन्नड साहित्य भवन सभागृहात कार्यक्रम होता. कार्यक्रम उरकून मंत्री हेगडे परतत होते. त्यावेळी चन्नम्मा चौकामध्ये दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. वक्तवाचा निषेध करत काळे झेंडे दाखविले. त्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी या प्रकाराला हरकत घेतली. तर, सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर मारीहाळ आणि सहाय्यक पोलिसांनी दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत मंत्र्यांचे व त्यांच्या ताफ्याला मार्ग करून दिला. आंदोलनाने काहीकाळ तणाव होता. पोलिसांची कुमक वाढवली होती.

Web Title: Belgaum News Union Minister Anantkumar Hegde has black flags in Belgaum