बेस्टच्या ताफ्यात नवीन 303 बस 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - मुंबईतील "बेस्ट'च्या ताफ्यात एप्रिलअखेर 303 नवीन बसचा समावेश होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. 

"बेस्ट'च्या ताफ्यातील 300 गाड्या बंद होणार असल्याने त्याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार असल्याबाबत कॉंग्रेसच्या भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नवीन बस येणार असल्याची माहिती दिली. 

"टाटा मोटर्स लिमिटेड'ला 303 नवीन बस पुरविण्यासाठी "बेस्ट'ने 4 मार्च 2016 रोजी खरेदीचा आदेश दिला होता. नवीन गाड्यांचा बेस्टच्या ताफ्यात समावेश होण्यापूर्वी पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन या संस्थेची मान्यता आवश्‍यक असून, ती 15 फेब्रुवारीला मिळाली आहे. बसचा तातडीने पुरवठा करण्याविषयी टाटा मोटर्सला कळविण्यात आले असून, मार्च 2017 अखेरपर्यंत 115 तर एप्रिलअखेरपर्यंत उर्वरित 188 बस दाखल होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 

Web Title: Best of the new 303 bus