Bhagat Singh Koshyari | 'मुंबई' प्रकरणावर राज्यपालांचा अखेर माफीनामा!

bhagat singh koshyari apologized for mumbai financial capital of-india statement on gujarati rajasthan people
bhagat singh koshyari apologized for mumbai financial capital of-india statement on gujarati rajasthan people

मुंबई : राज्याती गुजराती-राजस्थानी लोकांविषयी बोलताना राज्यपालांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर माफी मागीतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. या विधानावर अनेक स्तरातून टीकेला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर आज भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे

राज्यपालांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात, "दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे." असे म्हटले आहे.

bhagat singh koshyari apologized for mumbai financial capital of-india statement on gujarati rajasthan people
Sanjay Raut | राज ठाकरेंच संजय राऊतांच्या बाबतीतल भाकीत खरं ठरलं?

"गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही." असेही कोश्यारी यावेळी म्हणाले आहेत .

पुढे राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, "महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो." असे देखील राज्यपाल म्हणाले आहेत.

bhagat singh koshyari apologized for mumbai financial capital of-india statement on gujarati rajasthan people
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com